Breaking News

अटकेतील आरोपींना कोरोना

पनवेल ः बातमीदार

एनआरआय पोलिसांनी नुकतेच चोरीच्या गुन्ह्यात चार जणांना अटक केली. यापैकी तिघे आरोपी कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पकडून आणणार्‍या तपास पथकातील पोलिसांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

संजय अपुणे, प्रताप लोमटे-पाटील, दत्ता कांबळे आणि रोशन कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 16 ऑगस्ट रोजी वाहन चोरी झाल्याचा गुन्हा एनआरआय पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यासंबंधी तपास करताना आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्याआधारे पनवेल परिसरातून चौघांना अटक करण्यात आली. चौकशीतून नेरूळ आणि तळोजा येथील ट्रक चोरीच्या गुन्ह्याचाही उलगडा झाला. यातील संजय अपुणेवर एपीएमसी नेरूळ, तळोजा आणि कळंबोली पोलीस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 30 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती तपासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चासकर यांनी दिली. आरोपींना पकडल्यावर नियमाप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी करताना तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यातील एक जण वाशी, तर दोन जण पनवेल येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असून अन्य एक तळोजा कारागृहात आहे. त्यांच्या वैद्यकीय अहवालामुळे त्यांना पकडणार्‍या पथकातील सात जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, मात्र अन्य कोणालाही कोरोना झाल्याचे समोर आले नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply