आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचेही रक्तदान
पनवेल ः प्रतिनिधी
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (दि. 17) खारघर व मोहोपाडा येथे झालेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराला संबंधित दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड स्कूल खारघर येथील शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर मोहोपाडा येथे भारतीय जनता पक्ष आणि आमदार महेश बालदी यांच्या मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिबिराचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रक्तदान करून सर्वांना प्रेरणा दिली. खारघर येथील शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच प्लाझ्मासाठी 27 जणांनी सॅम्पल दिले. मोहोपाडा येथील शिबिरात 48 रक्दात्यांनी रक्तदान केले.
कोरोना महासाथीचा मुकाबला करताना ’संगठन ही सेवा’ उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येत आहेत.
खारघर येथे झालेल्या शिबिरास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कामोठे मंडल सरचिटणीस सुशील शर्मा, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, समीर कदम, निशा सिंह, अमर ठाकूर, विनोद घरत, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, योगेश लहाने, परेश बोरसे, अमर उपाध्याय आदी उपस्थित होते.
तसेच मोहोपाडा येथे झालेल्या शिबिरास युवा नेते प्रवीण खंडागळे, सुनील माळी, शेखर तांडेल, डॉ. अविनाश गाताडे, सचिन तांडेल, सरपंच शिवाजी माळी, निलेश माळी, प्रवीण जांभळे, दिलीप माळी, प्रतीक भोईर, हरीश पाठारे, दिलीप माळी, मनोज पवार, महादेव कांबळे, उपसरपंच विलास माळी, रोशन पाटील, आकाश जुईकर, जगन्नाथ चव्हाण, रवी राठोड, यादव दिघे, अशोक मालुसरे आदी उपस्थित होते.
देशातील प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने देश प्रगतीचा आलेख चढत आहे. प्रथम राष्ट्र, नंतर संघटन व त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत भाजपच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 सप्टेंबरपासून भाजप सेवा सप्ताहाच्या आयोजनातून सेवाकार्य करीत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर सेवाकार्य केले जात असून यात कार्यकर्ते सहभाग घेऊन विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आहेत.
-प्रशांत ठाकूर, आमदार तथा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष