उरण ः वार्ताहर
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत करळ-सावरखारचे विद्यमान उपसरपंच प्रवीण गजानन घरत यांनी बुधवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी प्रवीण घरत यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी त्यांचे अभिनंदन केले. सदर पक्षप्रवेश भाजप उरण कार्यालयात झाला.
या वेळी आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उरण तालुका भाजप महिला उपाध्यक्ष निर्मला घरत, ग्रुप ग्रामपंचायत करळ -सावरखार सदस्य महेश घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उरण तालुका सहखजिनदार तथा भाजप सावरखार अध्यक्ष गणेश घरत, सोनारी ग्रामपंचायत सदस्य जितेश कडू, सावरखार युवा अध्यक्ष जितेंद्र घरत, ग्रामसुधारणा मंडळ फुंडे अध्यक्ष परशुराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper