
पेण : प्रतिनिधी, उरण : वार्ताहर
देशातील अन्य राज्यात मंदिरे खुली, पण महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद महाराष्ट्रातील दारुची दुकाने सुरू पण मंदिरे मात्र बंद राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या घंटानाद आंदोलनास महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. त्या अनुषंगाने पेण व उरणमध्ये शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पेणमध्ये आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोटेश्वर मंदिर पेण येथे घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी भाजप दक्षिण रायगड उपाध्यक्ष वैकुुुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांनी आंदोलनात सोशल डिस्टन्सिंग पाळून व मास्कचा वापर करून सहभागी व्हावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील व शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी यांनी केले आहे.
तसेच भारतीय जनता पार्टी उरणच्या वतीने उरण तालुक्यातील सर्व गावांमध्ये आप-आपल्या गावात मंदिर समोर घंटा नाद करणार आहेत. या घंटानादमध्ये सर्व, लोकप्रतिनिधी, प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क चा वापर करून आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करून घंटानाद आंदोलन मध्ये सहभागी, असे अवाहन उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर यांनी केले आहे. उरण नगरपरिषद हददीतील उरण शहरात मोरा गावातील साईबाबा मंदिर समोर, भवरा येथील हनुमान मंदिर समोर, गणपती चौक येथील गणपती मंदिर समोर, कोट गावातील श्री राघोबदेव मंदिर समोर घंटा नाद केले जाईल, अशी माहिती भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिली.