Breaking News

उरण शहर व तालुक्यात भाजपचे घंटानाद आंदोलन

उरण : वार्ताहर – मंदिरे, देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उरण शहर परिसरासह तालुक्यात भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 29) घंटानाद आंदोलन करण्यात आले. आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर व शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

उरण शहरातील राघोबा देव मंदिर कोटनाका येथे ओबीसी तालुका अध्यक्ष हेमंत भोंबले, धीरेन पाटील, सनी भोईर, हितेश भोईर, प्रीतेश भोईर, वीरेंद्र भोईर, मंगेश पाटील, विश्वास पाटील, रोहन पाटील, अजय भोईर, तर बालई येथील गणपती मंदिरासमोर राजेश म्हात्रे, राकेश पाटील, महेश माळी, योगेश म्हात्रे, भारत पाटील यांनी घंटानाद केला.

उरण भवरा मांगीदेव मंदिर येथे महिला शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, नगरसेवक नंदू बाबाजी लांबे, नगरसेविका आशा शेलार, संजय गीरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोप्रोली शाखेतर्फे एकवीरा मंदिर येथे महिला तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, तसेच उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. या वेळी कोप्रोली कार्याध्यक्ष नीलेश पाटील, महिला अध्यक्ष निशा म्हात्रे, कोळीवाडा अध्यक्ष सूरज म्हात्रे, युवा चिटणीस महेश कोळी, युवा कार्यकर्ते हितेश म्हात्रे, जितेंद्र कोळी, मच्छिंद्र कोळी आदी उपस्थित होते.

पिरकोन गावात तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, ओबीसी सेलचे सचिव प्रमोद म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते चावजी गावंड, मंगेश गावंड, गाव अध्यक्ष सुनील घरत आदींच्या उपस्थितीत, तर नवीन शेवा येथे चंद्रकांत घरत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घंटानाद केला.

सावरखार येथील शंकर मंदिरासमोर घंटानाद करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष निर्मला घरत, ग्रुप ग्रामपंचायत करळ-सावरखारचे उपसरपंच प्रवीण घरत, सदस्य महेश घरत, ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, तालुका सहखजिनदार तथा सावरखार अध्यक्ष गणेश घरत, युवा अध्यक्ष जितेंद्र घरत, वामन घरत, वीरेंद्र घरत, आकाश घरत, प्रीतम घरत, देवेंद्र घरत, दिवेश घरत आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply