Breaking News

बारामतीकरांनी 14 वर्षे नीरेचे पाणी पळविले

उदयनराजेंची रामराजेंसह शरद पवारांवर टीका

सातारा : प्रतिनिधी

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्षे पाणी बारामतीला पळविले. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवले, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही उदयनराजेंनी म्हटलं. 1954 च्या पाणीवाटप करारानुसार नीरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला 43 टक्के तर उजव्या कालव्यातून सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूरसाठी 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. 2009 मध्ये अजित पवारांनी यात बदल करीत बारामतीला पाण्याचा मोठा टक्का देऊ केला. मात्र, आता सरकारने पुन्हा एकदा 1954 च्या पाणी वाटपानुसार पाणीवाटप करण्याचा अध्यादेश जारी केला.

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो.

पुन्हा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा निर्णय भाजपने घेतला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply