Breaking News

चेन्नईचा सलग दुसरा विजय

दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी पटकावले असून, शेन वॉटसन

सामनावीर ठरला आहे.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला अंबाती रायुडूच्या बाद होण्याने पहिला धक्का बसला. तो 21 धावांवर बाद झाला. सलामीवीर वॉटसनने 4 चौकार आणि 3 षटकार लगावत 44 धावांची खेळी केली. अमित मिश्राने त्याला माघारी धाडले. केदार जाधव आणि सुरेश रैनाने खेळ सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरेश रैना 30 धावा काढून परतला. कर्णधार धोनीने 32 धावा करत चेन्नईला विजयी पथावर नेले. सामना जिंकायला अवघ्या 2 धावांची गरज असताना केदार जाधव बाद झाला. अखेरच्या षटकात मैदानात आलेल्या ब्रॅव्होने चौकार लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक चहरच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिले यश मिळाले. तो 16 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर पायचीत झाला. पहिल्या सामन्यात झंझावाती खेळी करणारा ऋषभ पंत या सामन्यात प्रभावी कामगिरी करू शकला नाही. 13 चेंडूत 25 धावा करून तो झेलबाद झाला. पाठोपाठ कॉलिन इन्ग्रॅमदेखील 2 धावांवर बाद झाला. किमो पॉलच्या रूपात दिल्लीला निम्मा संघ तंबूत परतला. एका बाजूला एकामागून एक गडी बाद होत असताना सलामीवीर शिखर धवनने दुसर्‍या बाजूने खिंड लढवत ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 45 चेंडूत अर्धशतक गाठले, मात्र 51 धावांवर तो लगेचच झेलबाद झाला. 6 गड्यांच्या मोबदल्यात दिल्लीने चेन्नईसमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य ठेवले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply