Breaking News

आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण

प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत; शैक्षणिक नुकसानीची भीती

नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची ऑनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार की नाहीत, याबाबत पालक चिंतेत आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या माध्यमातून 17 जून, 2020 रोजी निवड यादीतील विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबत कार्यवाही करण्याची प्राथमिक जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आल्याचे पत्र देण्यात आले होते, परंतु शाळांच्या माध्यमातून अद्याप निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. महापालिकेने या प्रकियेला गती देण्याची मागणी केली जात आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शाळा प्रशासनांना करण्यात आल्या होत्या. या उपक्रमांतर्गत प्रवेशाबाबत अपडेट घेतले जात आहे. किती विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, याची माहिती शाळांकडून घेत असल्याचे नमुमपाचे शिक्षणाधिकारी योगेश कडुसकर यांनी सांतितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply