Breaking News

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी (दि. 31) निधन झाले. 84 वर्षीय मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी सर्व प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 10 ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. एक दिवस आधीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply