पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील मोठे भिंगार येथे सुभाष जेठू पाटील क्रिकेट संघ भिंगार यांच्या वतीने ‘आमदार चषक’ या मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कर्तेश्वर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 21) करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील मोठे भिंगार येथील कर्तेश्वर मैदानात श्री. सुभाष जेठू पाटील क्रिकेट संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार चषक मर्यादित षटकांच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट सामन्यांचे अयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक एक लाख 20 हजार, द्वितीय 60 हजार, तृतीय 30 हजार, तर चतुर्थ क्रमांकासाठी 30 हजार रुपयांचे पारितोषिके ठेवण्यात आले आहे. हे क्रिकेट सामने 21 ते 25 जानेवारीदरम्यान सुरू राहणार आहेत.
क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप महाराष्ट्र कामगार सेलचे सचिव सुभाष पाटील, पळस्पे जिल्हा परिषद युवा मोर्चा उपाध्यक्ष अशोक पाटील, पळस्पे जिल्हा परिषद अध्यक्ष योगेश लहाने, युवा मोर्चा पनवेल तालुका ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, उपसरपंच मच्छिंद्र दुर्गे, सुनील पाटील, कोन पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, बालाराम फडके, देहू पाटील, जानू पाटील, पुंडलिक पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, संदीप खेत्री, संतोष कथारे आदी उपस्थित होते.
Check Also
दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…
एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …
RamPrahar – The Panvel Daily Paper