Breaking News

राज ठाकरेही मंदिर प्रवेशावरून आक्रमक

मुंबई ः प्रतिनिधी  
भाजप, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशावरून राज्यातील आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सरकारला मंदिरे उघडण्याबाबत इतका आकस का आहे, असा सवाल करतानाच सर्वांत शेवटी मंदिरे उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरे उघडण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही, तर सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला आहे. महाविकास आघाडी सरकारचे काही बाबतीतील धोरणशैथिल्य बुचकळ्यात टाकणारे आहे. सरकारने मंदिरांबाबत एक नियमावली आखून मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply