पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल येथील एलिगंट टच या सलूनचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हा नवीन व्यावसायिक उपक्रम नईम चिकटे यांचा असून त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने नईम चिकटे यांचा एलीगंट टच सलून हा ब्रँड खूप लवकर नावारूपाला आला आहे. या वेळी विक्रांत पाटील यांनी त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थितीत युवकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना संकट काळात नोकर्यांची समस्या उद्भवत असल्याने युवा मित्रांनी काळानुरूप बदलून असेच छोटे व्यवसाय सुरू करण्याविषयी पुढाकार घेतला पाहिजे, तेव्हाच आपल्याला स्वतः आत्मनिर्भर होता येईल आणि देशाच्या आत्मनिर्भरतेमध्ये भरीव योगदान देता येईल. या वेळी नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, प्रशांत पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.