Breaking News

एमटीडीसीची कोकणातील रिसॉर्ट्स, हॉटेल्स सुरू

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात कंटाळा आलेल्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडू इच्छिणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि ई-पासबाबत काही नियम शिथिल झाल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन मंडळानेदेखील (एमटीडीसी) कोकणातील आपली सर्व रिसॉर्ट्स आणि ह़ॉटेल्स सुरू करण्याचा  निर्णय घेतला आहे. सध्या किमान 33 टक्के बुकिंग घेतली जाणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने ही बुकिंग होणार असून, पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. कन्टेन्मेंट झोनमधील पर्यटकाला मात्र या वेळी बंदी असणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरकरिता या रिसॉर्ट्स व हॉटेलचा वापर केला गेला होता ती सर्व टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती एमटीडीसीचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply