Breaking News

देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

24 तासांमध्ये 86 हजार बाधित; एकूण संख्या 40 लाखांच्या पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी (दि. 5) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 86 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वांत मोठी वाढ आहे.
महाराष्ट्रात, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये देशात 86 हजार 432 कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 40 लाख 23 हजार 179 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे 24 तासांमध्ये एक हजार 89 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची 69 हजार 561वर जाऊन पोहोचली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 31 लाख सात हजार 223 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर आठ लाख 46 हजार 395 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले
एकीकडे देशात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असताना दुसरीकडे सलग आठ दिवस दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 77 टक्के आहे. 0.5 टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रांवर ठेवण्यात आले आहे. 3.5 टक्के रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे तसेच मृत्यूदर 1.74 टक्के आहे. सलग दुसर्‍या दिवशी 11.70 लाखांहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढत असताना दैनंदिन संसर्गदर 7.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply