Breaking News

सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग

अग्निशमन दलाची तत्परता; अनर्थ टळला

पनवेल : वार्ताहर

पनवेल ओएनजीसीजवळ रविवारी (दि. 11) घरगुती सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या ड्रायव्हर केबिनला आग लागली होती. घटनास्थळी सिडको व पनवेल महापालिका अग्नीशमन दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी दाखल होत तत्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

एचपी गॅस सिलिंडरने भरलेला शुभम ट्रान्स्पोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच 04-एफजे 4277) वाहतुकीदरम्यान पनवेल ओएनजीसीजवळ आला तेव्हा ट्रकच्या ड्रायव्हर केबीनला अचानकपणे आग लागली. घटनास्थळी अग्निशमन अधिकारी कर्मचारी यामध्ये फायरमन प्रफुल्ल पाटील (ड्रायव्हर ऑपरेटर), समीर म्हात्रे, लीडींग फायरमन उमाकांत पाटील, जे. के. पाटील, अभिजीत नावलगी, वाय. टी. शिंदे दाखल झाले. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply