उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे व विद्यालयातील शिक्षक वर्ग सोशल डिस्टन्सिंग पाळून यामध्ये सहभागी झाले होते. विद्यालयात आता नव्याने रुजू झालेले प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला गेला होता. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी विशेष मेहनत घेऊन वृक्षा रोपण कार्यक्रम यशस्वी केला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.