Breaking News

‘कोमसाप’च्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार

माणगाव ः प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20करिता तालुक्यातील गुणवंत शिक्षक म्हणून मुकेश रमेश भोस्तेकर आणि संगीता व्यंकट सुरशेट्टे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी शाखेच्या वतीने जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम यांच्या सूचनेनुसार गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्याचे शाखेच्या वतीने निश्चित झाले होते. त्यानुसार शाखेच्या अध्यक्ष सायराबानू चौगुले, उपाध्यक्ष भिडे मॅडम, सचिव रामजी कदम, कोषाध्यक्ष रूपेश शेट यांच्या विचारविनिमयातून तालुक्यातील नवोपक्रम करणार्‍या गुणवंत शिक्षकांचे नामांकन करून शिक्षण क्षेत्रात सतत 15 वर्षे विविध उपक्रम राबविणारे शिक्षक मुकेश भोस्तेकर आणि संगीता सुरशेट्टे  यांची या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कोरोनाच्या साथीमुळे सदर पुरस्काराची घोषणा अध्यक्ष सायराबानू चौगुले यांनी ऑनलाइन पद्धतीने समाजमाध्यमांवर केली असून एका छोट्याशा कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. माणगाव कोमसाप शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून यामुळे गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गुणवंत पुरस्कारप्राप्त शिक्षकांनीही शाखेचे आभार मानले आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply