Breaking News

आरपीआयचे महावितरणविरोधात हायव्होल्टेज आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार – रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नवी मुंबईर आरपीआईच्या वतीने नवी मुंबईतील वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वाशी येथील महावितरण कार्यालयावर गुरुवारी (दि. 10) हायव्होल्टेज मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी

राज्य सरकरविरोधात घोषणा देण्यात आल्या.

लॉकडाऊनमुळे आधीच उपासमारीची वेळ आलेल्या गरीब, मजूर, कामगार, झोपडपट्टी वर्ग, मध्यमवर्गीय वर्गाला महावितरणने भरमसाठ विजबिल पाठविल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे महावितरणकडून पाठविण्यात आलेली वाढीव विजबिले माफ करण्यात यावीत, अशी मागणी सिद्राम ओहोळ यांनी केली.

आंदोलनाच्या वेळी महावितरणचे मुख्य अभियंता माने यांनी निवेदन स्वीकारताना शिष्टमंडळाना आश्वासन दिले की, आपले म्हणणे शासनाला कळवले जाईल तसेच वीजबिल माफ निर्णय शासन दरबारी असून तो निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल. परंतु लॉकडाऊनच्या कालखंडात ज्यांचे बिल अवाजवी आले असेल त्या विभागात आमच्या अधिकार्‍यांमार्फत कॅम्प लावून त्यांचे विजबिल निश्चित कमी केले जाईल. या आंदोलनाचे आयोजन ठाणे लोकसभा युवक अध्यक्ष यशपाल ओहोळ संयोजन युवक उपाध्यक्ष विशाल कांबळे, अभिमान जगताप यांनी  केले होते.

या आंदोलनाला महिला अध्यक्षा शिलाताई बोधडे, राज्य उपाध्यक्ष नारायण मोरे, हावईताई गायकवाड, रमेश बोधडे, इम्रान शेख, विनोद वानखेडे, रमेश खिल्लारे, संकेत डोके, नसीम शाह, बाबा माने, विजय गायकवाड, आप्पा माने, बालाजी कांबळे, गोविंद गायकवाड, लक्ष्मण सोनवणे, महादू गायकवाड, कैलास अंभोरे, अजय कांबळे, अतुल लोंढे, बाळू शिरसाट, बलभीम ओहोळ तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply