Breaking News

रायगडात 25 रुग्णांचा मृत्यू; 834 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत.
मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 413, अलिबाग 101, महाड 92, पेण 54, खालापूर 38, श्रीवर्धन 28, कर्जत 22, माणगाव 20, उरण 18, रोहा व पोलादपूर प्रत्येकी 12, तळा सुधागड व म्हसळा प्रत्येकी आठ असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 35,450 व मृतांची संख्या 974 झाली आहे. जिल्ह्यात 28,251 जण कोरोनामुक्त झाल्याने 6225 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply