पाच जणांचा मृत्यू; 339 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि.13) कोरोनाचे 334 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 267 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 72 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 14, खांदा कॉलनी सेक्टर 9 गुरुदेव आर्केड, सेक्टर 13 सिटी पार्क रो हाऊस, कामोठे सेक्टर 11 स्वरगंगा सोसायटी आणि खारघर सेक्टर 20 शर्मिक सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2503 झाली आहे. कामोठेमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3242 झाली आहे. खारघरमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3041 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 53 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2793 झाली आहे. पनवेलमध्ये 33 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2647 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 685 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 14,911 रुग्ण झाले असून 12,501 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.90 टक्के आहे. 2056 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 344 जणांचा मृत्यूझाला आहे.
महाडमध्ये 34 जणांना लागण
महाड : महाड तालुक्यात रविवारी कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळून आले तर सात जनांनी कोरोनावर मात केली आहे आणि दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये 224 रुग्ण उपचार घेत असून, 1077 रुग्ण बरे झाले आहेत तर 51 जनांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाडमध्ये 1352 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
उरण तालुक्यात 20 नवे रुग्ण
उरण : उरण तालुक्यात रविवारी कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळले असून 32 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वशेणी पाच, खोपटे चार, मोठी जुई दोन, हनुमान मंदिरजवळ चीर्ले गावठाण, बोरखार तिसाई मंदिरजवळ, चीर्ले राम मंदिरजवळ, कुंभारवाडा, विंधणे, रांजणपाडा, फुंडे, विंधणे, तांडेलवाडी करंजा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1646 झाली आहे. त्यातील 1310 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 257 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
नवी मुंबईत 368 जणांना संसर्ग
नवी मुंबई : नवी मुंबईत 368 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईने बधितांची संख्या 30 हजार 663 झाली आहे, तर 350 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 26 हजार 485 झाली आहे. दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 658 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 57, नेरूळ 68, वाशी 53, तुर्भे 44, कोपरखैरणे 36, घणसोली 51, ऐरोली 52, दिघा सात अशी आहे.
कर्जतमध्ये 43 पॉझिटिव्ह
कर्जत : कर्जत तालुक्यात रविवारी 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यातील रुग्ण संख्या 1238 वर पोहचली आहे. त्यापैकी 942 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 53 झाली आहे.
नागोठण्यात महिनाभरात 91 रुग्णांची वाढ
नागोठणे : विभागातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज वाढतच आहेत. त्यात नागोठणे शहर सुध्दा मागे नसल्याचे दिसून येत असून महिनाभरात तब्बल 91 रुग्ण वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, त्यांनी वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होणार नसल्याचे सांगताना रविवारपासून संपूर्ण शहरात औषधांची फवारणी करण्यास प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट केले.