Breaking News

आजपासून संसदेचे अधिवेशन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेच्या अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून, खासदारांना डिजिटल पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयके सादर करणार आहे. त्यापैकी 11 अध्यादेश आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. त्यानुसार कोरोना वॉरियर्स, डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्यावर कुणी हल्ला केल्यास त्याला अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा हल्ला अजामीनपात्र गुन्हा असेल तसेच त्यात जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. 23 सप्टेंबरआधी सरकारला अधिवेशन घेणे कायद्यानुसार बंधनकारक होते. कारण दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ ठेवता येत नाही. त्यानुसार कोरोनाच्या संकटाशी झुंजत 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरविण्यात आलाय.

पाच खासदार कोरोनाबाधित

अधिवेशनाआधी पाच खासदार आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अधिवेशनासाठी सर्व खासदारांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नियमावलीचे पालन करावे लागेल.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply