कडाव : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विद्यमान उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कर्जतमध्ये गावभेटींना सुरुवात केली आहे. हालिवलीच्या सरपंच प्रमिला बोराडे यांनी कर्जत चारफाटा येथे औक्षण केल्यानंतर बारणे यांच्या गावभेटींना सुरुवात झाली. या वेळी त्यांनी दहिवली, वेणगाव, वदप, गौरकामथ, तांबस, कडाव, चांधई, नेरळ, डिकसळ आदी गावांना भेट देऊन, तेथील मतदारांशी संवाद साधला. कर्जत शहरातील पक्ष कार्यालयात बारणे यांच्या या दौर्याचा समारोप करण्यात आला. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावभेटीदरम्यान कडाव येथील श्री बालदिगंबर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मतदारांशी संवाद साधताना आप्पा बारणे यांनी सांगितले की, आपल्या परिवारातील आपला माणूस म्हणून मी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. विद्यमान उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या या गावभेटीच्या दौर्यात आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका उपाध्यक्ष अनिल ठाणगे, तालुका सरचिटणीस राजाराम शेळके, वर्षा बोराडे, जिल्हा युवाधिकारी मयूर जोशी, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संतोष भोईर, रेखा ठाकरे, यमुताई विचारे, करुणा बडेकर, मीना थोरवे, राजेश जाधव, सुदाम पवाळी, दिलीप ताम्हाणे, बाबू घारे, नीलेश पिंपरकर, विनायक पवार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल डाळींबकर, भाजप प्रज्ञाप्रकोष्ठचे नितीन कांदळगावकर, सुनील गोगटे, विलास श्रीखंडे आदी पदाधिकार्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी काम करणारा, बोलणारा व सक्षमतेने विषय मांडणारा सर्वसामान्य परिवारातील आपला माणूस आहे. मला कोणीही, कोठेही व कधीही भेटू शकता. प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून येणार नाही हे निश्चित आहे.
-श्रीरंग बारणे, उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ