Breaking News

सुरसागर दिवाळी पहाटची पनवेलकरांसाठी मेजवानी

कळंबोली : वार्ताहर

अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला व युवकांच्या मनावर राज्य करणारा कलर्स चॅनेलवरील रायझिंग स्टार, झी युवा संगीतसम्राट फेम सागर म्हात्रे व सारेगमप फेम श्रीला तांबे यांची सुरसागर म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरली. सुरसागर प्रस्तुत सागर म्हात्रे व श्रीला तांबे यांनी पनवेलमधील रसिकांसाठी मराठी आणि हिंदी सुमधूर गाण्यांची मेजवानी शनिवारी (दि. 26) सकाळी दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्य’मयी केली. विशेष आकर्षण म्हणजे सागरचा छोटा भाऊ सुमेध यांनी पहिल्यादांच केलेल्या पदार्पणात रसिक पे्रक्षकांची मने जिंकली.

पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके सभागृहात पहिल्यादांच आयोजित केलेल्या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप हळदे, प्रकल्प संचालक देवरुषी सर आदी मान्यवर उपस्थित होते. क़ार्यक्रमाचे नियोजन, रूपरेषा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. खोपकर सर यांनी, तसेच पनवेलचे गटविकास अधिकारी ते टगुरे सर यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply