Breaking News

संचारबंदी काळातील उल्लंघन; न्हावाशेवा पोलिसांकडून लाखोंची दंडवसुली

उरण : प्रतिनिधी

न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीदरम्यान शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍या 4398 व्यक्तींवर कारवाई करीत त्यांच्याकडून पाच लाख 73 हजार 280 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही माहिती न्हावाशेवाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे.

संचारबंदी काळात नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी न्हावाशेवा पोलिसांनी गस्ती पथके तयार केली होती. या पथकांकडून 4 जानेवारी ते 25 मेदरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 4398 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एनसी 188, विनामास्क 735, सोशल डिस्टन्सिंग 537, दुकाने आणि आस्थापना 71, विनाकारण फिरणारे 100, एमव्ही अ‍ॅक्ट 2504 आदींचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच लाख 73 हजार 280 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक दंड चार लाख 28 हजार 380 उलवे तर एक लाख 44 हजार 900 रुपये दंड जेएनपीटी-करळ परिसरातून वसुल करण्यात आला आहे.

या कारवाई न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक महावीर जाधव, ज्योती गायकवाड, निलेश फुले यांच्यासह कर्मचार्‍यांनी धडक कारवाईची मोहीम राबविली आहे. संचारबंदीची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply