मुरूड ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात 1980 मध्ये लागवड केलेली उंचच उंच सुरूची झाडे उन्मळून पडली असून या उजाड जागी स्वच्छता करून जय श्रीराम नागरी पतसंस्था, मुरूडतर्फे 100 सुरूच्या वृक्षांची नुकतीच लागवड करण्यात आली.
या वेळी पतसंस्थेचे चेअरमन अॅड. मोहन तांबडकर, व्हा. चेअरमन दिलीप जोशी, संचालक नंदकुमार जोशी, प्रकाश पंड्या, एम. एस. जाधव, व्यवस्थापक संजय ठाकूर व कर्मचारी वृंद उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून श्रीराम पतसंस्था रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असल्याचे व्हा. चेअरमन दिलीप जोशी यांनी सांगितले, तर समुद्रकिनारी हिरवाई करण्याचा पतसंस्थेचा अल्पसा प्रयत्न असल्याचे चेअरमन अॅड. मोहन तांबडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
व्यवस्थापक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रकिनारी सार्वजनिक बांधकाम विश्रांतीगृह ते ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या बाजूस स्वच्छता करून कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने सुरूच्या 100 झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात उमेश भायदे, मधुकर वाघरे, विनोद जोशी, सिध्दी गद्रे, निकेतन मसाल, प्रियांका भगत, बिपीन चोरघे, स्वराली विरकुड, सिध्देश निरकर, रूपेश जामकर आदींचा सहभाग होता.