Breaking News

रायगडातील धरणात मुबलक पाणी

रोहा : प्रतिनिधी

यावर्षी सुरुवातीला पाऊस दगा देईल असे वाटत असताना पावसाने सुरुवात केली. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली. पाऊस उशिरा आला असला तरी यावर्षी चांगला बरसला आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या नद्या भरून वाहत होत्या. समाधानकारक पाऊस यावर्षी रायगड जिल्ह्यात पडलेला आहे.

रायगड जिल्ह्यात छोटी मोठी असे एकूण 28 धरणे आहेत. या 28 धरणांपैकी 21 धरणे ही शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित सात धरणांपैकी चार धरणे 99 टक्के भरले असून उर्वरित तीन धरणामध्ये अनुक्रमे 97, 96, 83 टक्के धरण भरले आहेत.

रायगड जिल्ह्यात काही प्रमुख तालुक्यात ही धरणे असून या धरणातील पाण्याचा वापर औद्योगिक व पिण्यासाठी होत आहे. रायगड जिल्ह्यात पाण्याचा वापर होत असताना यातील काही पाणी आन्य जिल्ह्यातही पुरवठा केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील धाटाव, नागोठणे, महाड, पनवेल, विळे भागड, खोपोली, पेण, सुधागड, खालापुर, तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रासह आन्य ठिकाणी असलेल्या औद्योगिक क्षेत्रात पाणीपुरवठा केला जातो. रायगड जिल्ह्यात कुंडलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी आदी प्रमुख नद्या आहेत या प्रमुख नद्या सोबत अनेक उपनद्या जिल्ह्यात आहेत. या नद्या यावर्षी पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या होत्या. आज ह्या नद्यांना पाण्याची पातळी चांगली आहे.

रायगड जिल्ह्यात धरणातील पाण्याची पातळी चांगली आहे. मुबलक पाणी आता तरी रायगड जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यात जि धरण शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये फणसाड मुरुड, वावा तळा, सुतारवाडी रोहा, आंबेघर पेण, श्रीगाव अलिबाग, कोंडगाव सुधागड, घोटवडे सुधागड, ढोकशेत सुधागड, कवेळे सुधागड, उन्हेरे सुधागड, कडकी श्रीवर्धन, रानवली श्रीवर्धन, पाभरे म्हसळा, संदेरी म्हसळा, खिडवाडी महाड, कोथडे महाड, भिलवले खालापूर, कलोते मोकाशी खालापूर, डोणवत खालापूर, मोरबे पनवेल, उसरण पनवेल यांचा समावेश आहे. तर रायगड जिल्ह्यात 99 टक्के भरले धरणे यामध्ये काले श्रीवर्धन, साळोखे कर्जत, बामणोली पनवेल, पुनाडे उरण यांचा समावेश तर उर्वरित धरणांपैकी 83 टक्के अवसरे कर्जत,96 टक्के खैरे महाड, 97 टक्के वरंद महाड, अशा पद्धतीने धरण भरले आहेत.

Check Also

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …

Leave a Reply