Breaking News

महाबँकेच्या एक्सपोचे थाटात उद्घाटन

पनवेल : बातमीदार

बँक ऑफ महाराष्ट्र एक्सपोचे ओरायन मॉल, पनवेल येथे नुकतेच उद्योजक व ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी ओरायन मॉलचे संचालक मनन परुळेकर, बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे अंचलचे अंचल प्रबंधक जगनमोहन, सहाय्यक महाप्रबंधक जतीन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

या एक्सपोमध्ये लघु उद्योग ऋण व गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज व इतर किरकोळ ऋण सुविधा प्राप्त करण्याबद्दल माहिती देऊन व स्टॉलला भेट देणार्‍यांच्या शंकांचे समाधानसुद्धा करण्यात आले व काहींना मंजुरीसुद्धा देण्यात आली. बँक ग्राहक व नवी मुंबई, रायगडमधील नागरिकांनी स्टॉलला उदंड प्रतिसाद दिला.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply