Breaking News

‘लोकमान्य’तर्फे सिल्व्हर ज्युबिली ऑफर गुंतवणूक योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त – लोकमान्य मल्टिपपज को-ऑपरटीव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या लोकमान्य सिल्व्हर ज्युबिली ऑफर या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे.

या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारना किमान 20 हजार रुपये व त्यापटीत रक्कम गुंतविता येणार आहे. योजनेत किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 27 महिन्यात 25 हजार रुपयांचा परतावा मिळवता येणार आहें.

लोकमान्य मल्टिपपज को-ऑप सोसायटी लि.,ने अर्थ जगतात आपल्या व्यावसायिक कार्यप्रणालीच्या जोरावर विविध क्षेत्रात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत गरुडभरारी घेतली आणि सहकाराच्या या क्षेत्रात 25 वर्षे विश्वासहर्ता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता या सूत्रावर वित्त, शिक्षण, आरोग्य, विमा या क्षेत्रात यश संपादन केले.

तसे पाहता संस्था 31 ऑगस्ट 1995 रोजी स्थापना झाली, सामाजिक बांधिलकीतून संस्थेचे संस्थापक किरण ठाकूर यांनी ज्या वेळेस या संस्थेचा श्रीगणेशा केला तेव्हा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, लघुउद्योजकांसाठी पतनिर्मिती करणे आणि संस्थेच्या सभासदांना सर्वोत्तम परतावा देणे हि तीन प्रमुख ध्येये अधोरेखित करत कार्यप्रणाली आखली गेली. त्याला स्थापनेपासूनच उच्च तंत्रज्ञान, व्यावसायिक व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभाराची जोड दिली गेली. ज्यामुळे ही यशोभरारी संस्थेस शक्य झाली आणि आजमितीस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली राज्यातून 213 शाखा व 4800 कोटींच्या ठेवी यासह संस्था कार्यरत आहेत.

लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply