Breaking News

स्वामीनारायण ध्यान केंद्रातर्फे फूड पॅकेट्स

पनवेल : वार्ताहर

कोरोना वायरसमुळे पनवेलमध्ये आणि राज्य तसेच देशभर लॉकडाऊन आहे. त्या लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. अशा लोकांनी खावे तरी काय अशी परिस्थिती होती. त्या अनुषंगाने देवाज्ञाने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने या गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी 28 मार्चपासून तयार फूड पॅकेट्स देण्याचे ठरवले. सुरुवातीला 300 लोकांसाठी सुरु केलेले हे हळूहळू 950 फूड पॅकेट्सच वितरण रोज केले जात आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे. तोपर्यंत अशा गरजू लोकांना संस्थेमार्फत फूड पॅकेट्स वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे ट्रस्टी जयेश सोनेता यांनी दिली. सुरुवातीला हे वितरण पोलिसांमार्फत नंतर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. ह्यात मुख्यत्वे कळंबोली, रोडपाली, मार्बल मार्केट, निवारा केंद्र, करंजाडे, डोंबाळा येथील गरजू लोकांना वाटप करण्यात  येत आहे. या कार्याकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे सोशल डिस्टन्सिंग तसेच सरकारच्या नियमावली अंतर्गत काम करीत आहे. ह्या सेवेच्या कार्याकरीता महानगरपालिका पनवेल व पनवेल पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले आणि ह्या सेवेसाठी आमचे जे देणगीदार आहेत त्यांचे विशेष आभार मानत असल्याचे संस्थेचे ट्रस्टी जयेश सोनेता यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply