पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पेण-रामवाडी येथील रेल्वे लाईनवर मेगा ब्लॉक करण्यात आल्याने वाहतूक सलग दुसर्या दिवशी गुरुवारी (दि.28) दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने पेण ते वडखळ तसेच तरणखोप गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदला आहे. तर मोठ्या व छोटया पुलांची कामे देखील सुरू असून मातीचा भराव केला जात आहे. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. विषेशत: अंतोरा फाटा, पेण रेल्वे स्थानक, उंबर्डे फाटा, मळेघर ते वडखळ बायपास पर्यंत उकृाणपूल बांधले जात आहेत. परंतु हे काम वाहतुकीचा विचार करण्यात आला नसल्याने पेण रेल्वे स्थानक ते वडखळ या सहा कि.मी च्या अंतरात चार-चार तास रोज सकाळ व संध्याकाळी रात्री वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीमुळे सारेच जण बेजार झाले आहेत. दरम्यान पेण जवळील रामवाडी रेल्वे पुलावर रेल्वे लाईनवर गडर टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येऊन दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
त्यामुळे पेण ते कांदळेपाडा तरणखोप बायपास पासून गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भरउन्हात हा मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच नागरिकांचे फार हाल झाले. वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस कर्मचार्यांना कसरत करावी लागली.