अलिबाग ़: प्रतिनिधी
लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यात येणार्या अडचणी तसेच रांगेत उभं राहण्याच्या त्रासामुळे अनेक अपंग कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंगळवारी (दि. 6) प्रथमच अलिबाग येथे अपंगांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून दिव्यांग कर्मचारी संघटना आणि अलिबाग तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांचे लसीकरण हा उपक्रम राबवण्यात आला. याला अपंगांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 400 हून अधिक अपंगांचे या वेळी लसीकरण करण्यात आले. या उपक्रमाला नंदिनी कटारिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्यासह तहसील कार्यालय कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या शीना कटारिया, नंदिनी कटारिया आदि या वेळी उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी पहिल्या सत्रात मांडवा येथील प्राथमिक शाळेत तर दुपारच्या सत्रात अलिबाग येथील अरूणकुमार वैद्य हायस्कूल येथे अपंगांचे लसीकरण करण्यात आले. दिव्यांगांना लसीकरण करून घेण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अनेकदा लस न घेताच त्यांना घरी परतावे लागते. यात मोठा शरिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून आम्ही हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी सांगितले.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …