उरण : वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण नगर परिषद येथे मंगळवारी (दि. 22) वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसीम गॅस, रोहन भोईर, विकी पाटील, वसंत पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.