Breaking News

रोठ ग्रामपंचायत कर्मचार्यांचा कोरोना योद्धा सन्मान

धाटाव : प्रतिनिधी

कोरोना काळात उत्तम सेवा बजावणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कोरोना काळात ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या कर्मचार्‍यांनी उत्तम योगदान दिले, त्यांचा रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामसेविका अलका बामगडे, कर्मचारी उदेश वारांगे, हरिभाऊ घाग, सुरज वारांगे, स्नेहल बाईत, भावना कारखानीस, प्रचिता वारांगे, सविता साळुंखे, देवका वांंद्रे, पुरुषोत्तम सोलंकी, पांडुरंग देवकर यांचा कोरोना योद्धाने विशेष सन्मान करण्यात आला.

सरंपच नितीन वारांगे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, उपसरपंच वेदिका डाके, सदस्य वैभवी भगत, जिल्हा भाजप सोशल मीडियाचे राजेश डाके, रितेश घाग, राजेश भगत, विरेंद्र वारांगे या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply