Breaking News

पेणमध्ये शेकापला पुन्हा एकदा धक्का, झोतीरपाडा उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य भाजपत दाखल

पेण : प्रतिनिधी

शेकाप पुढार्‍यांच्या मनमानी कारभारला कंटाळून पेण तालुक्यातील झोतीरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सदस्यांनी गुरुवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पेण विधानसभा मतदारसंघात सध्या भाजप प्रवेशाची लाट उसळली आहे. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेणमधील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात झोतीरपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेकापचे नरेश काशिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्या रेखा नंदकुमार सांबळे, अक्षता सीताराम पाटील, शुभांगी दिनेश भोईर, निलेश काशिनाथ पाटील तसेच कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील, बबन आडसुळे, अरुण हिराजी पाटील, दत्ताराम हिराजी पाटील, शोकत मोमिन यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शेकापला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या वेळी यशवंत कुथे व संजय कुथे  उपस्थित होते.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply