पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 528 नव्या कोरोना रुग्णांची आणि 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी
(दि. 24) झाली, तर दिवसभरात 705 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 328, अलिबाग 47, पेण 34, माणगाव 21, कर्जत 20, खालापूर 18, उरण 16, महाड 15, रोहा 10, श्रीवर्धन आठ, पोलादपूर सहा, सुधागड तीन, मुरूड व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात 11, अलिबाग तीन, खालापूर, कर्जत व महाड प्रत्येकी दोन, पेण व श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 43 हजार 606 आणि मृतांची संख्या 1182 झाली आहे. जिल्ह्यात 37 हजार 398 जण कोरोनामुक्त झाल्याने 5026 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …