11 जणांचा मृत्यू; 375 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.24) कोरोनाचे 328 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 264 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 286 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 64 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला तर 89 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल दुर्गा प्रसाद, मिडल क्लास सोसायटी, व झुंजार सोसायटी, नवीन पनवेल निलकमल सोसायटी, खांदा कॉलनी नवोदय सोसायटी सेक्टर 7, आणि कळंबोली सेक्टर 5 ई येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2861 झाली आहे. कामोठेमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3828 झाली आहे. खारघरमध्ये 91 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3652 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3230 झाली आहे. पनवेलमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3125 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 727 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 17423 रुग्ण झाले असून 14905 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.55 टक्के आहे. 2123 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 395 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सुकापुर 10, उलवे नऊ, करंजाडे आठ, आदई चार, हेदुटणे तीन, उसर्ली तीन, कोप्रोली दोन, आजीवली व नेरे येथील प्रत्येकी दोन कोरोनाचा रुग्णांचा समावेश आहे, तर 89 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 5519 झाली असून 4776 जणांनी कोरोंनावर मात केली असून 96 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 16 जण पॉझिटिव्ह
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले असून 17 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी सहा, घरत अली नवीन शेवा दोन, चीर्ले जासई रेल्वे कॉलनी, बोकडवीरा, नेवल स्टेशन करंजा, श्रीराम समर्थ कोटनाका, कविकमल निवास द्रोणागिरी कॉलनी म्हातवली, नवीन शेवा, सोनारी, वशेणी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये नवघर तीन, द्रोणागिरी कविकमल, नागाव, मोरा कोळीवाडा, आवरे, ओएनजीसी, साई नगर बोरी, फुंडे बोकडवीरा, भेंडखळ, नवीन शेवा, करंजा, उरण कोळीवाडा, गणेश कृपा उरण, नवीन शेवा, साई निकेतन येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1790 झाली आहे. 1522 रुग्ण बरे झाले आहे. 181 रुग्ण उपचार घेत आहेत व 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये 20 जणांना संसर्ग
कर्जत : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यात गुरुवारी एका खाजगी डॉक्टरसह नवीन 20 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यातील आजपर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1534 वर गेली असून 1275 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 69 वर गेली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये अंजप गाव चार, टाकवे तीन, वारे दोन, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, कर्जत शहर, भिसेगाव, दहिगाव, शिरसे, नेरळ, मालवाडी, मार्केवाडी, कशेळे, आंबिवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.