Breaking News

दादरच्या उपसरपंचपदी रेश्मा घासे विजयी

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या रेश्मा घासे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजप आमदार रविशेठ पाटील तसेच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. भाजपच्या वतीने उपसरपंचपदासाठी रेश्मा घासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. शेकापच्या नंदिनी जोशी यांना पाच मते पडली. उपसरपंचपदी रेश्मा घासे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रा. पं. सरपंच विजय पाटील यांनी घोषित केले. आमदार रविशेठ पाटील समर्थकांच्या ताब्यात दादरच्या जनतेने ग्रामपंचायत दिल्याने दादर येथे सर्वसामान्य कार्यकर्ता या पदावर बसला पाहिजे या भावनेतून जनतेने सहकार्य केले. यासाठी ज्येष्ठ नेते गजानन म्हात्रे, मोहन नाईक, धनाजी पाटील यांनी आपल्या पक्षातील सर्वसामान्य माणसाला हे पद मिळायला हवे ही परंपरा सुरू ठेवली. त्याबद्दल त्यांचे व भाजप कमिटीचे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले. उपसरपंच रेश्मा घासे यांचे ज्येष्ठ नेते गजानन म्हात्रे यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले. या वेळी माजी सरपंच मोहन नाईक, ज्ञानेश्वर म्हात्रे, रोहिदास पाटील, गणेश पाटील, रवींद्र पाटील, समाधान ठाकूर, रेश्मा पाटील, ज्योती पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply