Saturday , June 3 2023
Breaking News

राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींचा थरार

मुरूड : प्रतिनिधी

जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाहनवाज डॉक्टर यांच्या नुरानी बोटीने प्रथम क्रमांक पटकाविला.  गेली अनेक वर्ष लाखो पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ला दाखवून परत आणण्याचे काम राजपुरी येथील बोटवाले करीत आहे. वार्‍याची दिशा, हवामान अशा जोखमीतून ते काही पैशांत सेवा देत असतात. या बोटचालकांमध्ये चैतन्य यावे म्हणून जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेने पाच वर्षांपूर्वी शिडाच्या बोटींची स्पर्धा सुरू केली. शिडाच्या बोटी वार्‍यावर हाकणे ही फार मोठी कसरत असून, कष्ट व अनुभव गाठीशी असेल, तरच ते जमते. दरवर्षी मार्च महिन्यात अशी शर्यत आयोजिली जाते. त्या वेळी या बोटींना नवीन शीड, पडदे व रंगरंगोटीने आकर्षित केले जाते. या वर्षी स्पर्धेत 10 बोटींनी भाग घेतला. यात जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेचे अध्यक्ष नसीम कादरी, संचालक इरफान आदमने, इरफान कारभारी, तसेच शाहनवाज डॉक्टर, वसीम कारभारी, इस्माईल आदमने आदी राजपुरी येथील बोट मालकांचा समावेश होता. या सर्वांत डॉ. शाहनवाज यांच्या नुरानी बोटीने बाजी मारली. द्वितीय क्रमांक रबानी बोट, तृतीय क्रमांक लक्ष्मी बोटीने पटकाविला; तर दुसर्‍या गटात सुलतान बोट प्रथम, सुभानी बोट द्वितीय व दिलभरी बोट तृतीय आली.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply