Breaking News

बँकेत नोकरीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार, वार्ताहर

एचडीएफसी बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून 28 वर्षीय तरुणाची तीन लाख 96 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील विक्रांत विजय देवधर याला नोकरीची गरज होती. त्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर  बायोडाटा अपडेट केला होता. मार्च 2020 मध्ये एका महिलेने त्याला फोन करून एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी मिळेल असे सांगितले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने वेबसाइटवरून विक्रांतच्या मेल आयडीवर ऑफर लेटर, जोईनिंग लेटर आणि एक वर्षाचा बाँड पाठवला होता. त्यानंतर विक्रांतला त्याने बँकेतून 32 हजार 700 रुपये भरण्यास सांगितले. विक्रांतने हे पैसे भरल्यानंतर पुन्हा मनीष अग्रवाल याने फोन करून काही रक्कम भरावी लागेल असे सांगितले. विक्रांतने क्रमाक्रमाने रक्कम भरली त्यानंतर ड्रेस कोडसाठी जवळपास दोन लाख रुपये भरण्यास सांगितले असता विक्रांतने पैसे भरले. एकूण तीन लाख 96 हजार 700 रुपये विक्रांतने समोरील व्यक्तीच्या अकाउंट मध्ये भरले. वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात असल्याने विक्रांतला फसवणुकीचा संशय आला. आणि त्याने त्याचे भरलेले पैसे परत मागितले तसेच पैशाबद्दल विचारणा केली असता समोरील व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. नोकरीचे आमिष दाखवून विक्रांत देवधर यांची फसवणूक करण्यात आली आहे.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply