Breaking News

सामाजिक कार्यकर्त्याला धमकी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा अभयारण्य परिसरातील वृक्षतोडीप्रकरणी तुम्ही हस्तक्षेप करू नका, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला गेला. तारा गावात राहणार्‍या दोघांविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाळा ग्रामपंचायत परिसरात रूपतारा फार्म येथे 12 एक जमिनीवरील 29 झाडे बेकायदा तोडण्यात आली. वनविभागाने या प्रकरणात फार्म हाऊसवर काम करणार्‍या सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करून जमीनमालकला वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. बाळाराम पवार या  आदिवासी व्यक्तीवरील गुन्हा मागे घेऊन संबंधित जमीनमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही होत – नसल्यामुळे ठाकूर यांना वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांच्याकडे अर्ज केला होता. तरीही वनविभागाने मालक आणि मशिनद्वारे वृक्षतोड करणार्‍या ठेकेदारावर गुन्हे दाखल केले नाहीत म्हणून या प्रकरणाचा पाठपुरावा ठाकूर करीत आहेत. मात्र या प्रकरणात तुम्ही लक्ष घालू नका, असा धमकीवजा सल्ला तारा गावातील संतोष कृष्णा पाटील आणि योगेश म्हात्रे यांनी ठाकूर यांना दिला.

28 नोव्हेंबर 2020ला सकाळी 11 वाजता युसूफ मेहरअली सेंटरमध्ये येऊन रूपतारामधील वक्षतोड अतिक मस्ते यांनी केली आहे आणि पुढील भरावाचे काम काम आम्ही दोघांनी घेतले आहे. त्यामुळे तुम्ही तक्रार करू नका, प्रसिद्धी माध्यमात काही देऊ नका, असे बोलून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ठाकूर यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. वृक्षतोड करणार्‍यांवर योग्य ती कारवाई होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे बेकायदा वृक्षतोड करणारे जमीन मालक व वरील तीन व्यक्तींकडून माझ्या जीवितास भविष्यात धोका असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply