Breaking News

उरण नगरपरिषदेतर्फे गांधी व शास्त्री जयंती साजरी

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषद उरण यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांची जयंती उरण नगरपरिषद वतीने शुक्रवार (दि. 2) ऑक्टोबर रोजी ठिक-ठिकाणी साजरी करण्यात आली. उरण नगरपरिषद, गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा व मोरा (उरण) येथील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास  हस्ते पुष्पहार घालण्यात आले.

उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेते रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेविका रजनी कोळी, यास्मिन गॅस, जानव्ही पंडीत, दमयंती म्हात्रे तसेच नगरसेवक नंदकुमार लांबे, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, मेराज शेख आदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घातला.

या वेळी उरण नगरपरिषद अभियंता झुंबर माने, उद्यान निरीक्षक महेश लवटे, जसीन गॅस, उरण नगरपरिषद कर्मचारी, जगदीश म्हात्रे, हरेश जाधव, संजय दाते, सचिन नांदगावकर, प्रकाश मोरे, हेमंत भोंबळे व उरण नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply