Breaking News

शेतकर्यांना सुधारित शेतीचा कानमंत्र

पूर्वा दिवकरचा स्तुत्य उपक्रम

नागोठणे ः प्रतिनिधी

येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांची कन्या पूर्वा दिवकर या विद्यार्थिनीने याच गावातील काशिनाथ धुमाळ आणि इतर शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सुधारित भात लागवडीमुळे बियाणांची 30 टक्के बचत कशी होते व त्यामुळे रोपे तयार करण्याचे श्रम, पैसे तसेच मजुरांचा खर्च कसा वाचतो याचा कानमंत्र देत हे प्रात्यक्षिकांसह दाखवून दिले.

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ती शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालय अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विद्यालयात शिक्षण देणे शक्यच नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच विविध उपक्रम राबविण्यात यावे, अशी सूचना महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.

पूर्वाचे मूळ गाव रोहे तालुक्यातील यशवंतखार हे असून त्या अनुषंगाने या वेळी पूर्वा दिवकरने शेतकर्‍यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबडीच्या पिल्लांना राणीखेत हा रोग येऊ नये यासाठी लासोटा लस कशी दिली जाते, पावसाळ्यानंतर आंब्याच्या पालवीला कीड व इतर रोगांपासून वाचविण्यासाठी औषधांची फवारणी कशी करायची, हेसुद्धा प्रात्यक्षिक करून दाखविले. या भागात असणारी शेती पारंपरिकरीत्या केली जात असल्याने या नवीन तंत्रज्ञानाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल, अशी भावना या शेतकर्‍यांनी या वेळी व्यक्त केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply