Breaking News

दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार; राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग होणार सुरू

अमरावती : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय व खासगी शाळा-महाविद्यालये बंद आहेत, परंतु दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये मात्र संभम आहे. राज्यात अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू झाला असून, जूनपासून हळूहळू जवळपास सर्व बाबी खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अखेर दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार आहेत. या शाळा सुरू करीत असताना सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिले जाईल, असा दावा शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी केला आहे. एखाद्या शिक्षकाचे वय 50च्या पुढे असेल तर त्याच्याऐवजी दुसर्‍या शिक्षकाला घेता येईल का? तसेच बाधित मुले शाळेत येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का, याचाही विचार सुरू असल्याचे कडू यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply