नागोठणे ः प्रतिनिधी
तरुणींना स्वरक्षण मार्गदर्शन व प्रशिक्षण तसेच दुर्ग संवर्धन मोहीम हाती घेतलेल्या येथील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या अभियानांतर्गत रविवारी (दि. 27) पाली येथील सुधागड किल्ला तसेच रविवारी (दि. 4) घोसाळगड, कुडा लेणी व तळगड या ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत शूरनारी प्रतिष्ठानचे संस्थापक ऋत्विज माने, अध्यक्ष आशिष वाळंज, सचिव मंदार इंद्रे यांच्यासह कुणाल शेळके, गीता कुथे, ममता महाडिक, लिनीता महाडिक, ऋतुजा खांडेकर, जान्हवी गोळे, दिक्षा खाडे, सुप्रित चोपडेकर, दीपेश खांडेकर, पवन विश्वकर्मा, ऋषिकेश कलरकर, वेदांत पाटील, उदित माने तसेच स्थानिक तरुण सहभागी झाले होते. रविवारी सकाळी घोसाळे येथील घोसाळगड किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. या वेळी युवा-युवती ग्रुपचे रितेश भोसले, स्वप्नील गांगणे व जय कटे यांनी प्रतिष्ठानच्या सर्वांना संपूर्ण गड दाखवून माहिती दिली. गडाच्या पायथ्याजवळ पोलीस पाटील शिवाजी मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष आशिष वाळंज यांनी प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. घोसाळे येथील युवा-युवती ग्रुपच्या अश्विनी फुलारे यांनी ग्रुपची माहिती देऊन असेच कार्य करण्यासाठी शूरनारी प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या. घोसाळे येथील निवृत्त शिक्षक प्रकाश भगत यांनी गडाचा ऐतिहासिक ठेवा जपणार्या शूरनारी प्रतिष्ठानच्या तरुण-तरुणींचे कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.दुपारी कुडा लेणीची स्वच्छता केल्यानंतर तळा येथील तळगड या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता करण्यात आली. या वेळी तळा संस्कृती संवर्धनचे सचिव धनेश केतकर यांनी गडाची माहिती देऊन तेथील अडीअडचणी उपस्थितांसमोर स्पष्ट केल्या.