Breaking News

ग्रामीण पत्रकार असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी

नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. 3) सायंकाळी येथील आराधना भवनमध्ये उत्साहात संपन्न झाला. खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, उद्योगपती डॉ. जितेंद्र खेर, शिवराम शिंदे, नरेंद्र जैन, सदानंद गायकर, निजाम सय्यद, गोवर्धन पोलसानी, विलास चौलकर, भाईसाहेब टके, ज्येष्ठ पत्रकार जयंत धुळप, सोपान जांबेकर, किशोर म्हात्रे, लियाकत कडवेकर, पिगोंडेचे सरपंच संतोष कोळी, कडसुरेचे सरपंच राजेंद्र शिंदे, उदय जवके, सचिन कळसकर, अतुल काळे आदी सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. कार्यक्रमात संघटनेकडून कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार उदय भिसे (नागोठणे), उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अल्ताफ चोरडेकर (रोहे) आणि गुहागरचे उमेश शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मी स्वतः पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे, मात्र, राजकारणात प्रवेश केल्याने पत्रकारितेपासून दूर जावे लागले याची मला नेहमीच खंत वाटते. पत्रकार खर्‍या अर्थाने सरकारची तसेच विरोधी पक्षाची भूमिका बजावतो. लेखणी हे दुधारी हत्यार असून रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती घडवू शकतो, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्याचीच प्रचिती आजही अनुभवास येते, असे भाजपचे ज्येष्ठ नेते, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्या वतीने बोलताना उदय भिसे यांनी सांगितले की, 26 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असून लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आजही कार्यरत आहे. या वेळी पालकमंत्री तटकरे यांनी जिल्ह्यातील समित्यांवर पत्रकारांची सदस्य म्हणून नेमणूक करावी, अशी आग्रही सूचनाही उदय भिसे यांनी केली. कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे शाहीर अशोक भंडारे यांच्या पोवाड्याने करण्यात आला. कार्यक्रमात जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत राहून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या डॉ. चेतन म्हात्रे आणि इतर गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी संघटनेच्या संकल्प या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिंबाजी गीते, तर प्रास्ताविक महेश पवार यांनी केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply