Breaking News

मूलगामी प्रकाशनकडून 21 हजार पुस्तकांची भेट

रोहे : प्रतिनिधी

कातकरी बोलीभाषिक मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील मूलगामी प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘आमच्या गोष्टी : मराठी-कातकरी स्तर 2’ या द्विभाषिक पुस्तकांच्या 21000 प्रतींचे लेखिका वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात मोफत वितरण करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या कातकरी बोलीभाषिक मुलांसाठी मूलगामी प्रकाशनने आमच्या गोष्टी-स्तर 2 मधील कापणी, कोल्ह्याने धरले, चारोळी, टोपली, तगारीतले पीठ, चमरीचे कोकरू, दसरा, पळसाची पाने, मोहाची फुले, मासे नि खेकडे या 10 गोष्टींच्या पुस्तकांच्या 2100 संचाचे मोफत वाटप करण्याचे ठरवले असून त्याप्रमाणे जिल्ह्यात रोहा, माणगाव, अलिबाग, कर्जत, पेण, पनवेल, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड, खालापूर तालुक्यातील कातकरीवस्तीवर काम करणार्‍या शिक्षकांच्या मदतीने हे द्विभाषिक पुस्तके विद्यार्थ्यापर्यंत पोहचवण्याचे काम सुरु आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply