Breaking News

घरफोडी करणारे गजाआड

पनवेल : बातमीदार

बंद गाळ्याचे शटर तोडून घरफोडी करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, वर्कशॉप फॅब्रिकेशनचे साहित्य, गुन्ह्यातील दुचाकी आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. खांदा कॉलनी, सेक्टर 9 येथील मेडिकलच्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईलची चोरी केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे, पोलीस निरीक्षक धुळबा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, पोलीस हवालदार अनिल पाटील, पोलीस नाईक दीपक डोंगरे, पोलीस शिपाई युवराज शिवगुंडे, दिगंबर सलगर, सचिन सरगर यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपींची माहिती मिळाली. आरोपी खांदा कॉलनी परिसरात रेकी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून मिथुन मोजलीस सिद्धार (26), अख्तर नूर्मिया शेख (19, रा. नांदगाव ) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरून नेलेले मोबाइल, वर्कशॉप फॅब्रिकेशनचे साहित्य, गुन्ह्यातील मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींना अटक केल्याने त्यांच्याकडून खांदेश्वर पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply