Breaking News

नवरात्रीतील गरब्यावर कोरोनाचे सावट; नृत्य नसल्याने तरुण-तरुणींचा हिरमोड; व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर

पनवेल : वार्ताहर

मार्च मध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि अनेक लहान-मोठ्या व्यापार्‍यांना तसेच मोलमजुरी करणार्‍यांना देशोधडीला लावले ते आजतगायत. अनेकांचे आराध्य दैवत गणपती सण सुद्धा सुना सुना गेला. त्यानंतर आता 17 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे गरबा नृत्याचा कार्यक्रम कुठेही होणार नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून अनेक लहान व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. पिढ्यान पिढ्या चालत असलेला हा पारंपारिक सण यावर्षी खंडित झाला आहे. जुनी जाणकर माणसे सांगतात की, आमच्या जन्मापासून नाही तर आमच्या पणजोबांच्या काळातही असा महाभयंकर प्रकार कधी घडला नव्हता. कोणते सण साजरे झाले नाहीत असा प्रकार कधीच घडले नाही. या कोरोनाने आजतगायत अनेकांवर मोठे संकट आणले अनेकांना देशोधडीला लावले. हजारोंना आपले जीव गमवावे लागले आणि अनेकांचे संसार ही मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केले. अनेक सणांचा आनंद हिरावून घेतला. अशी दहशत या कोरोनाने निर्माण केली आहे. गरबा नृत्याच्या वेळी अनेक ठिकाणी तरुण-तरुणी आणि इतर व्यक्ती एकत्र येऊन आनंद लुटतात. दसर्‍याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात तसेच घरोघरी जावून आपट्याची पान देऊन सोनं देण्याचा कार्यक्रम करतात. या वर्षी मात्र असे दिसणार नाही. प्रत्येक जण आप आपल्या घरात राहून जुन्या गोष्टींना उजाळा देणार आहे. एकंदरीत या कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र गरबा नृत्यावर मोठे सावट आले असून शुकशुकाट दिसणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply