पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष सन 2025-26च्या शाखा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 6) ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत व वाय.टी. देशमुख, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी.एन.घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गवशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, राहुल घरत, दर्शन ठाकूर, किशोर पाटील, रघुनाथशेठ देशमुख, ‘रयत’चे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, दोन्ही विद्यालयाच्या प्राचार्य अनुक्रमे ज्योत्स्ना ठाकूर व सायली वडवलकर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील व प्रणिता गोळे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख संजय उगले, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे, सागर रंधवे, अविनाश कजबजे आदींसह दोन्ही विद्यालयांचे अन्य सेवक उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper