Tuesday , February 7 2023

जनआशीर्वाद यात्रेसाठी अलिबाग नगरी सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ होत आहे. या जनआशीर्वाद यात्रेसाठी संपूर्ण आलिबाग शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी अलिबाग शहर सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी सकाळी 8.30 वाजता प्रारंभ होईल. प्रथम ते अलिबाग कोविड सेेंटरला भेट देतील. तेथे कोविड योद्ध्यांचा सत्कार करतील. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधतील. स्थानिक कोळीबांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतील. त्यांनतर शहरातील हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतील. ना. पाटील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये विविध प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर चरी, पेझारी, वाशी, पेण, खारपाडा, शिरढोण, पळस्पेमार्गे ही जनआशीर्वाद यात्रा पनवेल शहरात पोहचेल. पनवेलहून ही यात्रा उरण तालुक्यातील जासई येथे जाईल. तेथील हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. तेथून ही यात्रा बेलापूरकडे रवाना होईल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार नितेश राणे या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply